Friday, 8 May 2015

गाथा नं :१०१ "हजार अनर्थकारी गाथांपेक्षा एकच अर्थयुक्त गाथा श्रेष्ठ होय "



संदर्भ : धम्मपद खंड -२ : प्रकरण ८ :सहस्स वग्गो (सहस्त्र वर्ग )

श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असतांना तथागतांनी एक संन्यासी "बाहियदारूचिरीय" याला उद्देशून हि गाथा म्हटलेली आहे .



गाथा नं :१०१

"हजार अनर्थकारी गाथांपेक्षा एकच अर्थयुक्त गाथा श्रेष्ठ होय "


काव्यानुवाद : 
अनर्थकारी पद युक्त हजार गाथा असती जरी ||
एकच गाथा श्रेष्ठ असे , जी ऐकूनी लाभे शांति खरी ||२||


भावार्थ :
अनर्थकारी पदांनी युक्त अशा हजारो गाथा जरी कोणी गायल्या तरी ,एकच गाथा श्रेष्ठ असे शकते जी ऐकुन माणूस उपशांत होतो .



नमो बुद्धाय 
नमो धम्माय 
नमो संघाय 
जय भिम


Tuesday, 30 December 2014

Monday, 21 July 2014

गाथा नं :. १६ " कुशल कर्म सुख देतात" (उपासक धम्मीकाची गोष्ट )

गाथा नं :. १६

" कुशल कर्म सुख देतात"
(उपासक धम्मीकाची गोष्ट )



" कुशल कर्म सुख देतात"
(उपासक धम्मीकाची गोष्ट )

काव्यानुवाद :
इहलोकी अन परलोकी , पुण्यवान हा मोदितसे ।
होई मोदित , प्रमोदित , पाहुनी निजकर्म शुद्ध ते ।।१६।।

भावार्थ :
कुशल कर्म करणारा मनुष्य दोन्ही ठिकाणी प्रसन्न राहतो . 
या हि लोकात आणि परलोकातही . 
स्वत:हाचे पुण्यकर्म पाहून तो मोदित आणि प्रमोदित होतो

नमो बुद्धाय । 
नमो धम्माय । 
नमो संघाय ।

Saturday, 19 July 2014

गाथा नं :. १५ : "वाईट कृत्यातूनच दु:ख उदभवते "


गाथा नं :. १५

"वाईट कृत्यातूनच दु:ख उदभवते "



"वाईट कृत्यातूनच दु:ख उदभवते "

काव्यानुवाद :
इहलोकी अन परलोकी , उभयत्र पापी शोक करी ।
दु:ष्कर्म स्वत:च पाहुनिया , तो शोक पीडीत हो अंतरी ।।१५।।

भावार्थ :
पाप करणारा दोन्ही लोकात शोक करतो. या हि लोकात आणि परलोकातही . आपले दुष्ट कर्म पाहून तो शोक करतो आणि पीडीत होतो. 
नमो बुद्धाय । 
नमो धम्माय । 
नमो संघाय ।

Thursday, 17 July 2014

गाथा नं . १४ : "मनावर संयम असल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होत नाही "


गाथा नं . १४ 

"मनावर संयम असल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होत नाही "



"मनावर संयम असल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होत नाही "

काव्यानुवाद :
नीट छत ज्याचे साकरे , घरात त्या न वृष्टी शिरे ।
नीट जयाशी संवारिले , चित्ती अशा न राग शिरे ।।१४।।

भावार्थ :
एखाद्या घराचे छत साकारलेले असल्यास , त्या घरात जसे पावसाचे पाणी शिरू शकत नाही,त्याप्रमाणेच संयमाचा अभ्यास असलेल्या चित्तात तृष्णा किंव्हा आसक्ती निर्माण होऊ शकत नाही . 

नमो बुद्धाय 
नमो धम्माय 
नमो संघाय