"वाईट चिंतन व वाईट कृति दुखदायक असते ."
गाथा नं . १
काव्यानुवाद :
मन उगम सर्व धर्माचे , मन श्रेष्ठ मनोमय ।
मनाच्या मलिनतेन , बोले जो वा कर्म करी ।
दु : ख धावी तया पाठी , जैसे चाक बैल पदे ।।१।।
भावार्थ :
सर्व धर्म (चैतसिक अवस्था ) प्रथम मनात उत्पन्न होतात . मन हेच मुख्य आहे. ते धर्म मनोमयच आहे . जेंव्हा एखादी व्यक्ती मलिन मनाने बोलते किंवा तसे कार्य करते , तेंव्हा दु:ख त्या व्यक्तीच्या असे पाठी लागते , जसे बैलगाडीचे चाक बैलांच्या पायाच्या पाठीमागे धावत असते .
No comments:
Post a Comment