Saturday, 18 January 2014

गाथा नं . २ (यमकवग्गो) चांगले चिंतन व त्याप्रमाणे कृति करणे हे नेहमीच सुखदायक असते.



(यमकवग्गो)

----------------
गाथा नं . २ 
---------------



चांगले चिंतन व त्याप्रमाणे कृति करणे हे नेहमीच सुखदायक असते. 





काव्यानुवाद :
--------------

मन उगम सर्व धर्मांचे , मन श्रेष्ठ मनोमय ।
मनाच्या प्रसन्नतेने , बोले जो वा कर्म करी ।
तयाशी सुख ना सोडी , छाया न संग सोडी जसे ।।२।।

भावार्थ :
---------

सर्व धर्म (चैतसिक अवस्था ) प्रथम मनात उत्पन्न होतात. मन हेच प्रधान आहे. ते सर्व धर्म मनोमयच आहेत.जेंव्हा एखादी व्यक्ती स्वच्छ मनाने बोलते किंवा तसे कार्य करते , तेव्हा सुख त्या व्यक्तीकडे असे धावते , जशी त्या व्यक्तीची छाया त्याची साथ कधी हि सोडत नसते. 

---------------------

नमो बुद्धाय | 

नमो धम्माय |

नमो संघाय | 

साधू .साधू.. साधू ...

No comments:

Post a Comment