Tuesday, 15 July 2014

गाथा नं :. १३ : "मनावर संयम नसल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होतो "


गाथा नं :. १३

"मनावर संयम नसल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होतो "



"मनावर संयम नसल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होतो "

काव्यानुवाद :
नीट न शाकारीले छत , घरात ऐशा वृष्टी शिरे ।
नीट न ज्याशी संवारिले , चित्ती अशा या राग शिरे ।।१३।।

भावार्थ :
ज्याप्रमाणे घराचे छत नीट साकारलेले नसेल तर पावसाचे पाणी घरात शिरते , त्याप्रमाणेच संयमाचा अभ्यास त्या चित्ताला नसेल तर त्यात तृष्णा किंवा आसक्ती लवकरच निर्माण होते. 

नमो बुद्धाय |
नमो धम्माय |
नमो संघाय |

Tuesday, 17 June 2014

गाथा नं :. १२ : "सम्यक संकल्प करणाऱ्यासच सत्याचा लाभ होतो. "


गाथा नं :. १२

सम्यक संकल्प करणाऱ्यासच सत्याचा लाभ होतो. 



सम्यक संकल्प करणाऱ्यासच सत्याचा लाभ होतो. 

काव्यानुवाद :
सारास जाणती सार , असार असार जे गमती ।
त्या लाभ होई साराचा , सम्मा संकल्पी जे रमती ।।१२।।

भावार्थ :
जे सत्यास सत्य व असत्यास असत्य मानतात आणि जे योग्य विचारांमध्ये ( सम्यक संकल्पामध्ये ) संलग्न असतात. अशा व्यक्तींनाच सत्याचा लाभ होत 
असतो. 

नमो बुद्धाय 
नमो धम्माय 
नमो संघाय 

Monday, 14 April 2014

Statues of Equality dr.Bhimrav Ramji Ambedkar


Jay Bhim 





Statues of Equality
dr.Bhimrav Ramji Ambedkar 
Born on 14 th april 1891 in "mahu" Village

Wednesday, 26 March 2014

गाथा नं . ११ "स्मयक ज्ञानानेच सत्याचा साक्षात्कार होऊ शकतो "


गाथा नं . ११ 

"स्मयक ज्ञानानेच सत्याचा साक्षात्कार होऊ शकतो "



"स्मयक ज्ञानानेच सत्याचा साक्षात्कार होऊ शकतो "

काव्यानुवाद :

असारास मानती सार , सार असार जे गमती ।
ना लाभ होई सारांचा , मित्थ्या संकल्पी जे रमती ।।११।।

भावार्थ :

जे असत्यास सत्य व सत्यास असत्य मानित असतात व वाईट विचारांमध्ये जे रममान असतात , अशा व्यक्तींना सत्याचा लाभ होऊ शकत नाही .

नमो बुद्धाय 

Monday, 17 March 2014

गाथा नं . १० : "केवळ शीलवंतच काषाय वस्त्र परिधान करण्यास पात्र असते".


गाथा नं . १० 


"केवळ शीलवंतच काषाय वस्त्र परिधान करण्यास पात्र असते". 

"केवळ शीलवंतच काषाय वस्त्र परिधान करण्यास पात्र असते". 

"केवळ शीलवंतच काषाय वस्त्र परिधान करण्यास पात्र असते". 

काव्यानुवाद :
शीलात होई प्रतिष्ठीत , स्वच्छ करुनि स्वचित जो ।
संयम सत्य्युक्त बने , खरा काषाय पात्र तो ।।१०।।

भावार्थ :
ज्याने आपले मन स्वच्छ करून मनाचे विकार नष्ट केलेले आहेत. 

जो सदाचारी आहे.सत्य आणि संयमयुक्त अशी व्यक्तीच काषाय वस्त्र धारण करण्याची अधिकारी आहे .

नमो बुद्धाय 
नमो धम्माय
नमो संघाय 

Wednesday, 12 March 2014

गाथा नं . ९ "चित्त स्वच्छ नसलेली व्यक्ति काषाय वस्त्र परिधान करण्यास पात्र नसते".



गाथा नं . ९ 

"चित्त स्वच्छ नसलेली व्यक्ति काषाय वस्त्र परिधान करण्यास पात्र नसते". 





काव्यानुवाद : 
स्वच्छ न करता स्वचित्त जो , वस्त्रे काषाय धारितो ।
अभावी संयम सत्याच्या , काषायास न पात्र तो ।।९।।

भावार्थ :
जी आपले मन स्वच्छ न करता काषाय वस्त्र परिधान करतो.सत्य आणि संयमाच्या अभावी अशी व्यक्ति काषाय वस्त्र धारण करण्याचा अधिकारी होऊ शकत नाही

नमो बुद्धाय
नमो धम्माय
नमो संघाय 

Tuesday, 11 March 2014

गाथा नं . ८ "श्रद्धावान व उद्योगी व्यक्तीस मार हलवू शकत नाही."



गाथा नं . ८ 

"श्रद्धावान व उद्योगी व्यक्तीस मार हलवू शकत नाही."



काव्यानुवाद :
कामभोगी न विहरी , इंद्रीयाते जो सावरी ।
श्रद्धाशील वीर्यवान तो , भोजनी मात्र जाणी ।
मार कधीना त्या पाडी , जैसे वारा हिमालया ।।८।।

भावार्थ :
जो विलासी जीवन जगण्यात धन्यता मानीत नाही .इंद्रिय सुखाच्या आहारी न जाता , सर्व इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवतो. जो भोजनातील मात्र जाणतो , व जो श्रद्धाशील आणि उद्योगशील आहे , अशा व्यक्तीला मार बिलकुल हलवू शकत नाही . (विचलित करू शकत नाही) ज्या प्रमाणे वारा हिमालयाला हलवू शकत नाही .